काय म्हणतंय वार…. गुलाल कोणाचा,धनुष्यबाण की मशाल चा

0
1032

 

* चर्चानां उधाण *तर्क विर्तिक* पैजांच शिखर* प्रत्येकाला आपलीचं हमी *हाय व्होल्टेज लढत * आज घडीस विजय कोणाचा सांगण कठीण 

उमरगा :-  उमरगा – लोहारा अनुसुचीत जातीकरीता राखीव विधानसभेकरीता दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वा. पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत शांततेत कोणताही अनुचित प्रकार  न घडता सर्व उमेदवाराचे भविष्य मतपेटीत बंद झाले. त्याक्षणापासून महायुती, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते, आपलाचं उमेदवार निवडूण येणार असा दावा करत आहेत. कोणी म्हणत धनुष्यबाण कोणी म्हणत मशाल विजयी होणार.  मागील तीन पंच वार्षिक विधानसभा निवडणुकीत अशी चुरस कधीही निर्माण झाली नव्हती तशी चुरस 2024 च्या विधानसभा निवडणूक प्रसंगी दिसून आली.  दोन्ही बाजुचा कार्यकर्ता जीव ओतून काम करत असल्याची झालक दिसून आली.बर्‍याच गावात 50-50 टक्के तर काही गावात 70- 30 टक्के, 60-40 अशा टक्केवारीच्या गणिताची चर्चा  सुरु असून दोन्ही उमदेवारा पैकी कोणताही उमेदवार निवडून आल्यास फक्त 5 ते 6 हजार च्या फरकान निवडूण येईल असा अंदाज मतदारातून व्यक्त करण्यात येत आहे.महायुतीचे घटक पक्ष असो, अथवा महाविकास आघाडीचे घटक पक्ष असो सर्वांनी या निवडणुकीत अपार मेहनत घेतल्याचे चित्र दिसून आले. कोणाच्या नशीबाचा तारा चमकणार, कोणाला मतदाराची साथ भेटणार, कोण विजयी होणार हे दि.23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणारच  आहे.त्यापूर्वी सद्या विविध चर्चाना उधाण आले आहेत. प्रत्येक उमेदवाराचा नेता,कार्यकर्ता हा आमचाच उमेदवार निवडून येणार आहे. असा आत्मविश्वास दाखवत आहेत. कोण निवडणुक जिंकणार हे दि.23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे यात शंका नाही

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here