पेठ सांगवी येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा संपन्न

0
198
  1. उमरगा:- तालुक्यातील पेठ सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दि.29 रोजी पालक मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना गुंजोटे , उपाध्यक्ष कलिमोद्दिन शेख (उपाध्यक्ष ,शिक्षक पालक संघ) , प्रमुख पाहुणे गावच्या सरपंच सुमन सुभेदार ,उपसरपंच सिराज शेख , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील , उपाध्यक्ष उमेश सुरवसे , पोलिस पाटील ईश्वर सुरवसे उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रा.पं.सदस्य , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , गावातील पुरूष पालक व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व माहिती चौधरी सर यांनी दिली. यावेळी उमेश सुरवसे , ईश्वर सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपामध्ये मुख्याध्यापिका गुंजोटे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल व पुढील नियोजनाबद्दल पालकांना संबोधित केले व शाळेतील विविध उपक्रम – कार्यक्रम यांचा व्हिडीओ दाखवला. तसेच पालक व शिक्षक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संवाद व चर्चा घेण्यात आली. शेवटी अल्पोपहार व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इब्राहिम चौधरी व आभार सत्यपाल भंडारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चौधरी सर, स्वामी सर,भंडारे सर, साळुंके मॅडम,.झिंगाडे मॅडम,गायकवाड मॅडम, गोबाडे मॅडम,आळणे मॅडम,सौ.पाटील मॅडम व सौ.सुरवसे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here