घनकचरा पर्यवेक्षकाला शिवीगाळ, नगरसेवक खानापुरे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

0
239

लोहारा :- लोहारा शहरातील घनकचऱ्याचे पर्यवेक्षक गुरुनाथ रसाळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक आरिफ खानापुरे यांच्याविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात सोमवारी ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर येथील जनआधार संस्थेने २०२४-२५ या वर्षाचे लोहारा नगरपंचायतकडून शहरातील साफसफाईचे टेंडर घेतले आहे. या कामावर गुरुनाथ रसाळे हे पर्यवेक्षक म्हणून काम करतात. २८ नोव्हेंबर रोजी वार्ड क्रमांक १६ मध्ये साफसफाईचे काम करत असताना इदगाह मस्जिदजवळ घंटागाडीवर चालक हारून शेख, विमल शिंदे, जनाबाई शेवाळे होते.दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नगरसेवक आरीफ खानापुरे यांनी वार्डातील कचरा न उचलल्याच्या

कारणावरून अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ केली. तसेच ५ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जनआधार संस्थेचे चव्हाण यांच्या मोबाइलवर नगरसेवक खानापुरे यांनी फोन करून त्यांना तुमचा रसाळे माझा फोन उचलत नाही. त्याने माझा फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आहे, असे बोलत असताना चव्हाण यांनी रसांळेंना कॉन्फरन्स कॉलवर घेतले असता खानापुरे यांनी रसाळे यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या.

  1. अपमानकारक बोलले व धमकी दिली, अशी तक्रार गुरुनाथ रसाळे यांनी सोमवारी दि.9 रोजी लोहारा ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी नगरसेवक आरिफ खानापुरे यांच्याविरुद्ध बीएनएस व ॲट्रॉसिटीअंतर्गत असलेल्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार हे करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here