मुबंई – हैद्राबाद हायवे जकेकुर गावाजवळ दोन कार चा अपघात, सात प्रवाशी जखमी
उमरगा :- शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या जकेकूर जवळ दि.10 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता जकेकुर गावाजवळ दोन कार चा अपघात होऊन सातजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अपघाताची सविस्तर माहिती कार क्रमांक MH 12NJ 9351 व कार क्रमांक TS05F R1287 यांच्यात एकमेकासमोर समोरा समोर धडक होऊन सातजण जखमी झाले असून, जखमीची नावे उध्दव शिरगीरे वय – 40 जकेकुर, विशाल राजेद्र मुगळे वय- 22 रा. दाळींब, तनोजा राजन शिंदे वय- 20 रा. देगाव, गंजी शांताम्मा वय -65 रा. देवर कोंडा हैद्राबाद, पकडी मरी संपूर्ण राणी वय – 40 रा. देवरकोंडा, शाम सर जान पीरुमल्ला वय – 45 रा. देवरकोंडा हैद्राबाद, संपूर्ण रघुराम पगडीमरी रा. हैद्राबाद, याप्रमाणे आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच अपघात ग्रस्ताच्या सेवेत मोफत कार्यारत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीनां विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.