उमरगा:- उमरगा पोलीसांची दमदार कामगिरी 36 तासांच्या आत अपहरण करणारे 04 आरोपींचे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवरून मुसक्या आवळुन अपहृत व्यक्तीस आरोपींच्या ताब्यातुन मुक्त केले
फिर्यादी प्रसाद प्रकाश तेलंग वय 22 वर्षे रा. कसगी ता. उमरगा यांनी दि. 15 रोजी फिर्याद जबाब दिला की, दि.14 रोजी रात्री 09:00 वा.सु. मी आमचे शेतामध्ये काम करीत असताना गावातील रविराज हॉटेलचे प्रदिप कांबळे यांनी फोनवरून कळविले की, वडील प्रकाश विश्वनाथ तेलंग हे रात्री 09:00 वा.सु. त्यांचे हॉटेलवर आले होते. तेंव्हा हॉटेलचे समोर एक पांढऱ्या रंगाची ईरटीगा कार आली होती. गाडीतील अनोळखी व्यक्तीने तुझे वडीलांना गाडीकडे बोलावुन घेवुन गाडीत बसवुन उमरगाकडे जाणारे रोडने घेवुन गेले आहेत असे कळविल्याने मी व माझा भाऊ प्रणव तेलंग असे हॉटेल रविराज येथे जावुन पाहीले असता तेथे वडीलांची मोटार सायकल उभी होती. वडीलांचे मोबाईलवर फोन केला असता त्यांचा मोबाईल लागत नव्हता. तो बंद झाला होता. मी वडीलांबाबत सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु कांही एक माहीती मिळाली नाही. माझे वडील प्रकाश विश्वनाथ तेलंग वय 45 वर्षे रा. कसगी यांना कोणीतरी अनोळखी इसमांनी अज्ञात कारणासाठी गाडीत बसवुन पळवुन घेवुन गेले आहेत वगैरे फिर्याद जबाब दिले वरून पो.स्टे. उमरगा गु.र.नं. 767/2024 कलम 137 (2) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासिक अधिकारी गजानन पुजरवाड, पोउपनि , रामहरी चाटे, पोना / 1613 यासीन सय्यद, पोकॉ/373 सोनटक्के, पोकॉ / 1826 शुभम दिवे यांनी चौरस्ता ते कवठा पाटी तसेच तलमोड ते सोलापुर रोडवरील अत्यंत सचोटीने व कौशल्यपुर्वक सर्व ठिकाणचे CCTV फुटेज पाहणी करून संशयीत वाहनाचे CCTV फुटेज ची पाहणी केली परंतु गुन्हयातील आरोपी त्यांनी वापरलेले वाहन व अपहृत इसमाबाबत कांही एक माहीती मिळाली नाही. त्यानंतर आरोपी हे अपहृत इसमाचे मो.नं. 9623780529 व 9309292610 या मोबाईल चालु करुन त्यांचे नातेवाईकांना फोनव्दारे खंडणीची मागणी करुन परत मोबाईल बंद करून दुसरीकडे निघुन जायचे त्यामुळे आरोपींचे निश्चीत लोकेशन मिळत नव्हते. त्यादरम्यान आरोपींनी पिडीतच्या नातेवाईकांकडुन एक लाख रुपयांची खंडणी मोबाईलव्दारे प्राप्त करुन घेतलेले होते. मोबाईलचे लोकेशन घेतले असता पिडीतचे मोबाईल लोकेशन हे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील येत होते परंतु सतत लोकेशन बदलत होते. तरीपण तपासिक अधिकारी व अंमलदार हे स्टाफसह सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता आरोपी व अपहृत इसम हे मिळुन आले नाही. व मोबाईल बंद येत होते. तरीपण पोलिस स्टाफ सिल्लोड येथे मुक्कामी थांबुन मोबाईल चालु होण्याची प्रतीक्षा करीत होते. दि. 16 रोजी पिंडीत मोबाईल चालु होवुन पुन्हा आरोपींनी खंडणीची मागणी करू लागले. त्यावेळी त्यांचे लोकेशन घेतले असता त्यांचे लोकेशन हे महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील लोकेशन येत होते. तेंव्हा सिल्लोड येथुन तात्काळ सदर ठिकाणी न थांबता पाच तासांचा प्रवास करून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने श्रीनाथ प्राईड हॉटेल चोपडा पोलिस ठाणे जि. जळगांव येथे आरोपींनी व पिडीत व्यक्तीने थांबलेल्या दोन रूमवर एकाच वेळी छापा मारुन चार आरोपी नामे आरोपी नामे 1) निंगय्या उर्फ मंजुनाथ रूकमय्या गुत्तेदार वय 32 वर्षे रा. जवळगा (जे) ता. आळंद जि. कलबुर्गी, 2) अजय प्रकाश निकाळजे वय 32 वर्षे रा. काकडे वस्ती कोंडवा (ब) ता. हवेली जि. पुणे, 3) रितेश रमेश बिबवे वय 27 वर्षे रा. मार्केट यार्ड, लास्ट बसस्टॉप, जी.एस. टॉवर, 9 नंबर गेट समोर पुणे, 4) गौरव गोकुळ केंदळे वय 20 वर्षे रा. शिवराई नगर बिबवेवाडी पुणे व हॉटेलमध्ये मारहाण करुन डांबुन ठेवलेल्या पिडीत व्यक्ती नामे प्रकाश विश्वनाथ तेलंग वय 45 वर्षे रा. कसगी ता. उमरगा यांची सुटका करण्यात आलेली आहे.
तपासात आरोपींना पोलिस ठाणे उमरगा येथे आणुन अटक करून गुन्हयातील आरोपीतांनी अपहृत इसमाचे मोबाईल वरून त्यांचे घरी कॉल करून अपहृत इसमास सोडण्यासाठी 3,00,000 रू. ची खंडणीची मागणी केली. तेंव्हा फिर्यादी यांनी आरोपीनां मागणी केल्याप्रमाणे अपहृत इसमाचे फोन पे अकाउंटवर 1,48,000 रूपये टाकले होते. आतापर्यंत एकुण 5 आरोपींना अटक करण्यात आलेले असुन फिर्यादीकडुन आरोपीतांनी बँक खात्यात घेतलेल्या खंडणीपैकी एकुण 73,000 रूपये गोठवण्यात आलेले आहेत. आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेले इरटीगा कार ज्यास MH-12-JC-5897 असे पासिंग नंबर असलेली कार 05 मोबाईल असे एकुण 4,50,000 रू. किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. तपास पोउपनि पुजरवाड हे करीत असुन सध्या आरोपी हे दि.23 तारखेपर्यंत पीसीआर मध्ये आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन , उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, तपासिक अधिकारी पोउपनि गंगाधर पुजरवाड, पोउपनि रामहरी चाटे, पोना / 1613 यासीन सय्यद, पोकों/373 सोनटक्के, पोकों/1826 शुभम दिवे यांनी केलेली आहे.