उमरगा:- शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाई इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग, कोरेगाववाडी येथे 21 डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना ध्यान कसे करावे व त्याचे निरोगी शरीराकरिता फायदे काय याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे प्रतिसाद दिला. जर ध्यान नियमित केले तर त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. चिंतेपासून आराम मिळतो. झोप न येण्याची समस्या दूर होते.विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.एकाग्रता वाढते.ध्यान केल्याने मानसिक शांती आणि ऊर्जा मिळते आणि मनात सकारात्मकता जाणवते. वास्तविक, दिवसभर कामात व्यस्त राहिल्याने शरीरासह मनही थकून जाते आणि ऊर्जाही संपते. अशा स्थितीत मनाला ऊर्जा देण्यासाठी ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे असे प्राचार्य महेश कदारे म्हणाले.यावेळी प्रा.अजय बेडदुर्गे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.परीक्षित शिरूरे, डॉ.अश्विनी सूर्यवंशी, प्रा.अंकिता यादव,प्रा.अशोक गायकवाड, प्रा. वैष्णवी फुगटे, प्रा. प्रिया धोंडगे, प्रा. प्राजक्ता ननवरे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा. अंकिता वडजे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, प्राचार्य अल्वीन काळे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.अभिजित पाटील, प्रा.आविनाश चौधरी, प्रा.शाहबाज शेख व विद्यार्थी उपस्थित होते.