उमरगा :- शहरातील शांताई मंगल कार्यालय येथे दि. 27 रोजी उमरगा तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे एक दिवसीय जीपीडीपी प्रशिक्षण खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.प्रशिक्षणाचे उद्घाटन संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नागराळ च्या सरपंच रेखा पवार व ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण जकेकुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्ताराधिकारी संजय राऊत, कोंडीबा भांगे, नंदकिशोर राठोड आदी मान्यवर उपस्थित होते .प्रशिक्षणामध्ये वैशाली घुगे, सत्यवती इंगळे किशोर औरादे आदींनी वेगवेगळ्या सत्रामध्ये सविस्तर असे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तालुका व्यवस्थापक किशोर औरादे, प्रतीक गायकवाड, गणेश कोकाटे, दिनेश पोतदार, अझरुद्दीन बेग, रमेश जाधव, अमीर शेख, प्रीतम राजपूत आदींनी परिश्रम घेतले