नांरगवाडी पाटीजवळ अज्ञात वाहनाची  धडक; एकजण जखमी

0
749

उमरगा:- तालुक्यातील  नारंगवाडी पाटी जवळ उमरगा- लातूर  रोडवर  एका अज्ञात वाहनाने पायी चालत जाणा-या एक व्यक्तीस धडक दिल्याने संबंधित व्यक्ती जखमी झाल्याची घटना दि.28 रोजी रात्री ठीक 8:00 वाजता  घडली आहे.लातुर उमरगा रोडवर चालत जाणा-या पुरुषाला आज्ञात वाहनाने धडक देऊन वाहन पसार झाले असून या अपघातात ज्ञानोबा प्रेमनाथ सुर्यवंशी वय 48 रा.माडज हे  जखमी झाले आहेत. सदर आपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले.असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here