*पोलिस निरीक्षक आश्विनी भोसले यांचा आदम भाभी शी असलेला संपर्क कामी आला*
उमरगा :- तालुक्यातील निलुनगर तांडयात राहणा-या 03 अल्पवयीन शाळकरी मुलीना ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथुन शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या स्कुलबस मधुन कांही लोकांनी अपहरण करून घेवुन गेले आहेत अशी घटना दि.27 रोजी सायं.5.42 वाजता घटना घडली असल्याची माहिती उमरगा पोलीस यांना दूरध्वनीवरून सांगण्यात आली. त्याचा आधार घेवून उमरगा पोलीसांनी ऑपरेशन मुस्कानचे प्लॅनिंग करुन त्याअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करुन 30 मिनिटाच्या आत 03 अल्पवयीन मुलींचा शोध लावुन त्यांना मोहोळ जि. सोलापुर येथुन ताब्यात घेवुन सुखरूपपणे पालकांचे ताब्यात दिले.
सविस्तर वृत्त बीट मार्शल योगेश बिराजदार यांना आलेल्या कॉलवरून कॉल करणारे व्यक्ती यांना लागलीच फोन करून तुम्हाला अपहरणाची गोष्ट कशी समजली याबाबत फोनवर विचारपुस केली. कॉल करणारे व्यक्तीकडे आलेल्या फोन नंबर हस्तगत करून सदर मोबाईल नंबरचे तातडीने लोकेशन काढले. कॉलर यांची अल्पवयीन मुलगी ज्या नंबरवरून अपहरणाची माहीती दिली त्या मोबाईल फोनचे लोकेशन मोहोळ जि. सोलापुर असे दर्शवित असल्याने सदर अनोळखी फोन नंबरवर कॉल करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या मिळालेल्या नंबरवर कॉल केला असता एका महिलेने कॉल उचलला तेंव्हा तिला या नंबरवरून कुठल्या मुलीने फोन केला होता का? असे विचारले असता त्यांनी हो एका 12/13 वर्षाच्या मुलीने बसमध्ये माझे शेजारी बसले होते. तिने मला एक फोन करायचा आहे म्हणुन माझा फोन घेतला होता असे सागितले. तेंव्हा कुठली बस आहे? स्कुलबसचे आहात का? असे विचारले असता त्यांनी पुण्याला जाणारी एसटी बस आहे असे सांगताच तुरोरी बीट अंमलदार अनुरूद्र कावळे यांना तात्काळ पुण्याला जाणारी बस उमरगा बस स्टॅन्ड मधुन किती वाजता जाते आणि ती आत्ता कुठे असेल तसेच बसस्टॅन्डवर 03 लहान मुली दि.27 रोजी दिवसभरात कोणी बघितल्या का याची माहीती घेण्यास कळविले. आदेशाप्रमाणे पोना कावळे यांनी बसस्टॅन्ड उमरगा येथे जावुन 10 मिनीटातच वरील सर्व माहीती घेवुन पो.स्टे.ला येवुन माहीती दिली.उमरगा बसस्टॅन्ड वरून पुण्याला जाणारी बस दुपारी 2 वाजता सुटते व ती आता साधारणतः सोलापुर जिल्हयातील मोहोळच्या आसपास असेल तसेच सकाळपासुन दुपार पर्यंत 03 लहान मुली बसची वाट पाहत बसलेल्या होत्या अशी माहीती दिली. त्यावरून लागलीच मोहोळ बसस्टॅन्ड येथे गाड्यावर काम करणाऱ्या परीचयाच्या आदम भाभी यांना फोन करून 3 लहान मुली मोहोळ बस स्टॅन्डवर दिसल्यास त्यांना तात्काळ थांबवुन ठेवावे असे कळवले. थोड्या वेळात आदम भाभीने आम्हाला 3 लहान मुली एका बसमधुन उतरल्या आहेत व रस्त्याची विचारपुस करत पंढरपूर रोडकडे निघाल्या आहेत असे कळवले. आम्ही त्या तिन्ही मुलींना स्टॅन्डवरच थांबवुन ठेवा असे सांगीतले. तेंव्हा त्यांनी बाजुस उभ्या असलेल्या एका इसमास सदर मुलींना थांबवण्यास व पुन्हा स्टॅन्डवर घेवुन येण्यास सांगितले. तेवढ्या वेळात उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांनी घटनेची माहीती दिली असता त्यांनी तात्काळ पो.स्टे. मोहोळ येथे माहीती कळवुन तेथील 02 पोलीस बसस्टॅन्ड मोहोळ येथे पाठवुन दिले. त्यांना स्टॅन्डवरील आदम भाभी चा मोबाईल नंबर देवुन त्याच्यांशी संपर्क साधुन तिन्ही अल्पवयीन मुलीना ताब्यात घेवुन पो.स्टे. मोहोळ येथे घेवुन येण्यास कळविले. त्याप्रमाणे पो.स्टे. मोहोळ येथील पोलीसांनी तिन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले त्यानंतर पो.स्टे. उमरगा येथुन पोलीस गाडी व तिन्ही मुलींच्या पालकांना पो.स्टे. मोहोळ येथे पाठवुन सुखरूपरित्या उमरगा येथे घेवुन येण्यासाठी रवाना केले. उमरगा येथील पोलीस यांनी पो.स्टे. मोहोळ येथे जावुन मुलींना ताब्यात घेवुन सुखरूपरित्या उमरगा येथे घेवुन येवुन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्या.सदर अपहरणाची बातमी मिळताच सपोनि तायवाडे यांनी तातडीने मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन घेतले, सपोनि कन्हेरे यांनी पंढरपुर टोलनाका येथे संपर्क साधुन तेथील कर्मचारी यांना पिवळ्या रंगाची स्कूलबस टोलनाक्यावर आल्यास त्यास तपासुन त्यात 3 अल्पवयीन मुली आढळुन आल्यास बस पुढे जाऊ न देता आमचेशी संपर्क करावा असे कळवले. पोउपनि पुजरवाड यांनी आमच्या सोबत मुलींची ओळख पटवणाऱ्या वस्तु, कपडे व आधारकार्ड याची माहीती घेवुन मोहोळ बस स्टॅन्ड येथील आदम भाभी व पोलीसांना तात्काळ पाठवले. पोना अनुरूद्र कावळे व बीट मार्शल पोकॉ योगेश बिराजदार यांनी MDT कॉल तात्काळ कळवुन बसस्टॅन्ड उमरगा येथे जाऊन मुली बसस्टॅन्डवर होत्या का ? व कुठल्या बसने गेल्या इत्यादी माहीती अचुकपणे व तात्काळ मिळवुन कळवली.अशा त-हेने MDT कॉलवर आलेल्या अपहरणाच्या गुन्हयाची माहीती मिळाल्यापासून अवघ्या 25 व्या मिनिटाला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करून युट्युब व इंन्स्टाग्रामवरील BTS-V या कोरीयन सिंगर / डॉन्स ग्रुपचे फॅन असल्याने पुण्याला पळुन जायचे व पैसे कमवुन दक्षिण कोरियाला जावुन BTS-V या ग्रुपला कसल्याही परिस्थितीत भेटायचेच असे ठरवुन कोणालाही कांहीएक न सांगता पळुन गेलेल्या 11 वर्ष वयोगटातील 02 मुली व 13 वर्ष वयाची 01 मुलगी असे एकुण 03 अल्पवयीन मुलींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्या आहेत.सदरची कामगिरी धाराशिव चे पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि पिराजी तायवाडे, सपोनि कन्हेरे, पोउपनि गंगाधर पुजरवाड, पोना अनुरूद्र कावळे, पोकॉ योगेश बिराजदार, पोकॉ बळीराम सोनटक्के यांनी केली असल्याची माहिती देण्यात आली.