जकेकुर गावाजवळ अपघात, दोघे किरकोळ, तर एकजण गंभीर जखमी

0
336

उमरगा:- तालुक्यातील मुबंई हैद्राबाद महामार्गावरील जकेकुर गावाजवळ  दि.1 जानेवारी रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल चा आपघात होऊन तीघे जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

दि. 1 रोजी रात्री ठीक 1:30 वाजता सोलापूर कडुन उमरग्याकडे येणारी मोटार सायकल क्रमांक KA38 V 9811 ही जकेकुर जवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने मोटार सायकल डीवायडर ला धडकुन दोघे कीरकोळ तर एक गंभीर जखमी झाले असून,  जखमी नावे पुढील प्रमाणे राजेंद्र  धोडीराम टाळकुटे वय 19 वर्ष,जयजयराव धोडींबा टाळकुटे वय 27, संदीप काकणो देवकते वय 24 सर्व  राहणार पांढरी, ता .मुखेड, जि. नांदेड सदर अपघातात जखमी झाले असून ,आपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here