एकुरगावाडी पाटी जवळ दोन दुचाकीचा अपघात; एक किरकोळ तर एक गंभीर जखमी

0
826
  • उमरगा:- तालुक्यातील लातुर – उमरगा रोडवरील एकुरगा वाडी पाटी जवळ दोन दुचाकीचा  अपघात होऊन एक कीरकोळ तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 2 जानेवारी रोजी रात्री 7.30  वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दि. 2 रोजी रात्री ठीक 7:30 वाजता लातुर रोड वर एकुरगा वाडी पाटी जवळ दोन मोटार सायकल चा अपघात होऊन दोघे जखमी झाले आहेत. पुढे  जाणा-या  मोटार सायकल क्रमांक MH25K 634 ला पाटीमागुन येणार्‍या मोटार सायकल क्रमांक AP10AS 7913ने धडक दिल्याने हा अपघात घडला असून अपघातात  आण्णाराव लक्ष्मण भोसले वय 60 वर्ष रा.मातोळा,ता उमरगा,हा कीरकोळ जखमी झाला आहे तर विकास गोपा चव्हाण वय 45 रा. कदेर हा गंभीर जखमी झाला आहे.

सदर आपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथे मागील तेरा वर्षांपासून अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल  करण्यात आले असल्याची माहीती रुग्णवाहीक चालक शेषेराव लवटे यांनी दिली  आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here