लुना दुचाकीला माठीमागून कारची धडक; एकजण गंभीर जखमी,तर एक किरकोळ जखमी 

0
1703

उमरगा – शहरापासून जवळच असलेल्या मुबंई – हैद्राबाद महामार्गावरील भारत पेट्रोल पंपा समोर दुचाकी  व कारचा अपघात होऊन एकजण गंभीर तर लहान बाळ कीरकोळ जखमी झाल्याची घटना दि. 4 रोजी दुपारी ठीक 1:40 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दि. 4 रोजी दुपारी 1.40 वाजण्याच्यासुमारास बलसुर कडुन उमरग्याकडे येणारी टी. व्ही. एस. लुना क्रमांक MH25W 7516 ला पाटीमागुन येणार्‍या कार क्रमांक TS07 KB 6728 ने जोराची धडक दिल्याने लुना दुचाकी  चालक दस्तगीर शेख वय- 65 रा. बलसुर हे गंभीर जखमी झाले असून, असद नवाज शेख वय- 4 वर्ष हे लहान मुल कीरकोळ जखमी झाला आहे.सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here