नगरविकास विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

0
65

 

* गोळा फेक स्पर्धा – ईरफान शेख ( सुवर्ण पदक),सोलो डान्स स्पर्धा – व्यंकट क्षीरसागर (प्रथम क्रमांक),100 मीटर धावणे स्पर्धा – प्रदीप आडसुळे(व्दितीय क्रमांक),सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धा- नळदुर्ग नगरपरिषद (प्रथम क्रमांक),व्हॉलीबॉल स्पर्धा – मुरूम नगरपरिषद (प्रथम क्रमांक)*

 

धाराशिव :- महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांचा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला असून, यास्पर्धेत उमरगा नगरपरिषद चे कर्मचारी इरफान शेख यांनी गोळा फेक स्पर्धेत -( सुवर्ण पदक),व्यंकट क्षीरसागर यांनी सोलो डान्स स्पर्धेत (प्रथम क्रमांक), कळंब नगरपरिषद चे लेखापाल प्रदीप आडसुळे यांनी 100 मीटर धावणे स्पर्धेत(व्दितीय क्रमांक),सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेत- नळदुर्ग नगरपरिषद (प्रथम क्रमांक),व्हॉलीबॉल स्पर्धेत- मुरूम नगरपरिषद (प्रथम क्रमांक)* यांनी उत्तम कामगीरी केल्याने जिल्हा नगरविकास विभागाच्यावतीने संबंधिताचा दि 5 रोजी धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडासंकुल येथे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

तीन दिवसीय स्पर्धाच्या कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील विविध नगर परिषद,नगरपंचायत चे मुख्याधिकारी, संवर्ग अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.शहरातील तुळजाभवानी क्रीडा मैदानावर २ ते ४ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत गुरूवारी पार पडले. यावेळी नगरपरिषद प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त अजितकुमार डोके, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, धाराशिवचे मुख्याधिकारी वसुधा फड, उमरगा व लोहाराचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, परंडाचे मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, भूमच्या मुख्याधिकारी शैला डाके, वाशीचे मुख्याधिकारी कांबळे, तुळजापूर आणि नळदुर्गचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, मुरूमचे मुख्याधिकारी सचिन भूजबळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेस

प्रारंभ करण्यात आला. या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, बुध्दीवळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, नृत्य, गायन, नाटक, रांगोळी यांसह विविध स्पर्धांमध्ये भाग घेतले होते. स्पर्धेतील विजेत्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालीअसून. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नगरविकास विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here