लातुर – उमरगा रोडवर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून कारची धडक, एक गंभीर जखमी

0
830

उमरगा :-  लातुर – उमरगा रोडवर थांबलेल्या दुचाकीला  लातूरकडून येणा-या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 10 रोजी रात्री ठीक 8:00 वाजता घडली आहे.

 

लातुर कडुन उमरग्याकडे येणारी कार क्रमांक MH19CZ 1152 ने थांबलेली मोटार सायकल क्रमांक MH25AA 4638 ला जोराची धडक दिल्याने मोटार सायकल चालक शिवाजी बाबुराव कुंभार वय 40, रा. कोरेगाव वाडी हा गंभीर जखमी झाला आहे. सदर आपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथे आपघात ग्रस्ताच्या मधतीला मोफत आसलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले.असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here