श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयांच्या रासेयो विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न

0
83

 

उमरगा :- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजनचे ” युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी” या थीम आधारितविशेष निवासी शिबिरचे उद्घाटन मौजे जकेकुरवाडी येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवराच्या हस्ते श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.विनोद देवरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना विनोद देवरकर सरांनी रासेयो च्या स्वयंसेवकांनी अमर सूर्यवंशी यांचा आदर्श समोर ठेवून आपल्याही गावचा विकास करावा. अशा शिबिरामधून विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने जडणघडण होत असते. स्वयंसेवकांनी सतत राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद Not Me But You समोर ठेवून कार्य करावे. असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ विलास इंगळे सर होते. जकेकुरवाडी गावाला मिळालेले ‘संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानाचे विभागीय स्तरीय प्रथम पुरस्काराबद्दल सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे विशेष कौतुक करून पुढील राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या. या गावचेआमच्या महाविद्यालयाशी असलेले आतूटनाते असेच कायम राहतील. असे प्रतिपादन त्यांनी अध्यक्षीय भाषणातून केले
या सात दिवसीय विशेष शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, शोष खड्डे, वृक्ष संगोपन, ॲनेमिया तपासणी, बाल विवाह प्रतिबंध जनजागृती आदी उपक्रम घेतले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ पद्माकर पिठले, उपप्राचार्य गुंडाजीबापू मोरे, डॉ डी.व्ही. माने सर , गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. देवेंद्र सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य श्री.ओमशिवाआप्पा मुळे, श्री.मधुकर सूर्यवंशी, श्री.व्यंकट औरादे, ग्रामस्थ, महाविद्यालयीन प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here