उमरगा:- तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे देवस्थान ट्रस्ट व संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर पार पडले.यावेळी 175 रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. गुरुवर्य हभप वै उजवलानंद महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी हभप भीम महाराज,हभप हरी लवटे गुरुजी,हभप ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी आदींची प्रमुख उपस्थिती होती.संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ सुभाष येळापुरे,छाती विकार,मधुमेह व अतिदक्षता तज्ञ डॉ निलेश येळापुरे यांनी रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले.उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली.यावेळी दिलीप भालेराव,प्रकाश अष्टे,माजी सभापती सचिन पाटील,बसवराज कस्तुरे,कुमार पवार,शाहूराज भोसले,राहुल हेबळे,मनोज पाटील,मल्लिनाथ स्वामी,आकाश पाटील,सदानंद पाटील आदींची उपस्थिती होती.या शिबिरात अनियंत्रित शुगर,उच्च रक्तदाब,दमा,किडनी विकार,पोटाचे विकार आदी आजारांची तपासणी करण्यात आली.तसेच ईसीजी व रक्त तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.अचलबेट परिसरातील गावातील जवळपास 175 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमेश्वर हॉस्पिटलचे स्टाफ सचिन राठोड,कैलास गायवाड,रजनीकांत पाटील,रमेश,काजल कुंभार,कोमल कांबळे आदींनी परिश्रम घेतले.