उमरगा :- शहरातील शिवाई हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअर सेंटर येथे दि.18 रोजी मोफत दमा प्रशिक्षण व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसिद्ध दमा व छाती विकार तज्ञ डॉ. विजय बेडदुर्गे यांनी उपचार व मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये 78 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यावेळी शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, कोरेगाववाडी येथील विद्यार्थ्यांनी रुग्णांना दमा रोगाविषयी माहिती दिली. तसेच मोफत मार्गदर्शन पुस्तिकीचे वाटप करण्यात आले. शिवाई हॉस्पिटलचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करत आहोत. तसेच गेल्या पंधरा वर्षांपासून मोफत दमा प्रशिक्षण व उपचार शिबीर शिवाई हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. याचा शेकडो दमा रुग्णांना लाभ झाला आहे. जास्त चालल्यावर श्वास गुदमरणे, वारंवार खोकला येणे व दम लागणे, सर्दी, श्वास घेताना शिट्टीचा आवाज येणे, खोकल्यात बेडका पडणे, फुल, धूळ, धूर, उग्र वास इत्यादीची ऍलर्जी असणे, कारखान्यातील धुरामुळे व त्यात काम केल्यामुळे होणारा त्रास ही दमा रोगाची लक्षणे असल्याचे डॉ. विजय बेडदुर्गे यावेळी म्हणाले.
रुग्णांनी दमा रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तपासण्या पूर्ण करून उपचार घ्यावेत. औषधे वेळेवर घ्यावीत. बेडरूममधून कार्पेट काढा आणि नियमितपणे स्वच्छ करा.घरात फक्त सुगंध नसलेले डिटर्जंट आणि साफसफाईचे साहित्य वापरा.घर स्वच्छ ठेवा आणि जेवण डब्यात आणि बेडरूमच्या बाहेर ठेवा. यामुळे झुरळांची शक्यता कमी होण्यास मदत होते. शरीराचे अवयव आणि झुरळांच्या विष्ठेमुळे काही लोकांमध्ये दम्याचा अटॅक येऊ शकतो. जर एखाद्याला अशा प्राण्याची ऍलर्जी असेल ज्याला घरातून काढता येत नाही, तर त्या प्राण्याला बेडरूमच्या बाहेर ठेवावे. एअर कंडिशनरमधील फिल्टर वारंवार बदलावा. घरामध्ये धूम्रपान करू नये. अस्थमा असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी कुटुंब करू शकणारी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. घराबाहेर धूम्रपान करणे पुरेसे नाही. बाहेर धुम्रपान करणारे कुटुंबातील सदस्य आणि पाहुणे त्यांच्या कपड्यांवर आणि केसांवर धुराचे अवशेष आत ठेवतात. यामुळे दम्याची लक्षणे दिसू शकतात. जर तुम्ही धूम्रपान करत असाल, तर सोडण्याची ही चांगली वेळ आहे. वायू प्रदूषण, औद्योगिक धूळ आणि त्रासदायक धुके शक्य तितके टाळा. व्यायाम व प्राणायाम करावे असे डॉ.विजय बेडदुर्गे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले. यावेळी डॉ. स्नेहल कोकाटे, डॉ.आनंदी पवार, अनिता पटणे, अजित झांपले, स्वप्नील चव्हाण, तात्या जमादार, आकाश खामितकर तसेच सिपला, लुपिन व ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.