डॉ.मंजुषा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त  मोफत आरोग्य तपासणी

0
269

 

 

उमरगा :-  येथील जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय सचिव डॉ.मंजुषाताई चव्हाण यांनी तीळ गुळ स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त वाढदिवसाचे औचित्या साधून मोफत आरोग्य तपासणी व रक्त लघवीची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांना आरोग्य विषयक जनजागृती करून तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या व संक्रांतीचे वाण म्हणून राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, ताराराणी, अहिल्यामाई होळकर अशा विविध महानायिकांची पुस्तके वान स्वरूपात देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून जिजाऊ वंदनेने करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पीएसआय अनुसया माने मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या शिवमती रेखाताई सूर्यवंशी होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून विभागीय अध्यक्ष शिवमती रंजनाताई चव्हाण होत्या व जिजाऊ ब्रिगेडच्या लातूर जिल्हा संघटक शिवमती शोभाताई पाटील तर नाईचाकुर येथील शिवमती सुमनताई पवार व विभागीय कार्याध्यक्ष शिवमती सुनंदाताई माने आणि जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती रेखाताई पवार तसेच जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती संध्याताई शिंदे या होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी महिलांनी मोठ्या उत्साहाने या शिबिरात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तर उमरगा, मुळज, पेठसांगवी, नाईचाकूर,डिग्गी, ,गुंजोटी, कदेर, एकुंडी, एकुंडीवडी, त्रिकोळी, कसगी अशा अनेक गावातून महिला शिबिरासाठी उपस्थित होत्या.
त्यावेळी 385 महिलांची रक्त लघवी व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या रेखाताई सूर्यवंशी यांनी महिलांना आरोग्य विषयी मार्ग्यदर्शन केले तर उमरगा पोलीस स्टेशनच्या पीएसआय अनुसया माने मॅडम यांनी महिलांना शिबिरा बद्दल महत्त्व पटवून देऊन स्वतःचे आरोग्य कसे सांभाळले पाहिजे यावर त्यांनी मार्गदर्शन केले तसेच शीवमती रंजनाताई चव्हाण यांनी संघटनेबद्दल मार्गदर्शन केले तर तालुका सचिव ज्योतीताई राजपूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले
तसेच चव्हाण क्लिनिकच्या डॉ.मंजुषा ताई चव्हाण यांनी असा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवत महिलांना तिळगुळ घ्या गोड गोड घङङञबोला म्हणून शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे आभार मानले.
त्यावेळी कार्यक्रमासाठी सुलभा ताई जाधव,ज्योती राजपूत, निर्मला ताई देशमुख, सरस्वती पाटील, भाग्यश्री लोकरे, भागीरथी शिदे, ज्योती माने, रुक्मिण दंडगुले, ज्ञानेश्वरी काळे, औरादे बाई, मनीषा देखमुख, अर्चना माने, सावित्री माने, सुमित्रा पवार, दिपाली पवार, मंदा गायकवाड, रुक्मिणी दंडगुले, राजश्री दंडगुले,मनीषा माळी, राणी बिराजदार, बेबी राऊळगुंड, रोहिणी राऊळगुंड, सुरेखा कुलकर्णी, सुरेखा पवार, सुमन पवार,महादेवी माळी, अक्षरा जाधव पार्वती सुरवसे, महादेवी पवार, शुभांगी क्षीरसागर, सुवर्णा दुधभाते, उषा कांबळे व उमरगा येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच चव्हाण क्लिनिकचे डॉ. चव्हाण सर व रक्त पेडीचे..लॅब टेक्नेशियन युनुस मुल्ला, अजिंक्य कोळेकर, दामिनी जमादार, शिवानी कांबळे, शालू भालेराव ईत्यादी उपस्थित होते..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here