लोहारा:- संघटन पर्व अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या राज्यभर सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे, या अभियानाअंतर्गत औसा विधानसभा मतदारसंघाने प्रति बूथ सर्वाधिक सदस्य नोंदणी करून राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. दि.4 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आ.अभिमन्यु पवार यांचा सत्कार करून औसा भाजपला गौरविण्यात आले. आ.अभिमन्यु पवार यावेळी सांगितले कि, माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हा अत्यानंदाचा क्षण असून हा सन्मान मी औसा मतदारसंघातील माझ्या जिवाभावाच्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो. या अभियानासाठी औसा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे हा सन्मान आहे आणि अशा मेहनती सहकाऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे, असे आ. अभिमन्यु पवार यांनी सांगितले.