लोहारा (खु.) येथे गोळ्या घालून एका चा खून

0
434

लोहारा :-  तालुक्यातील लोहारा (खु) येथे एका २८ वर्षीय तरुणांचा गोळ्या झाडून खून झाल्याची घटना दि.६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान घडली आहे. मयत झालेल्या तरुणांचे नाव नितीन मधुकर आरगडे (वय २८) आहे. तो शेतकरी आपल्या शेता जवळील ओढ्यातील पाण्याची मोटार काढून तलावावर बसवण्यासाठी जात होता. त्या दरम्यान अज्ञात दोघांनी गोळया घातल्या असल्याचे सांगितले जाते. नितीन यांचा जागेवरच मृत्यू झाला असून या वेळी दोघा संशयीताना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, लोहारा पोलिस निरीक्षक अजित चिंतले, उपनिरीक्षक सचिन केंद्रे उपस्थित होते. खुनचे कारण अद्याप ही समजले नसून याबाबत रात्री उशिरापर्यंत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील खून कोणत्या कारणा मुळे याबाबत सकोल माहिती पोलीस चौकशी नंतर समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here