उमरगा :- तालुक्यातील उमरगा-लातूर रोडवरील नारंगवाडी पाटीजवळील पुलावर लातुर कडून येणा-या पिकअप ने बाबा पाटील यांच्या इनोव्हा कारला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला असून, अपघातात शिवसेना (उबाठा)गटाचे वरीष्ठ नेते बाबा पाटील हे किरकोळ जखमी झाले असून, या अपघात आणखीन पाच जण किरकोळ झाले आहेत. हा अपघात दि 07 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडला असल्याची घटना घडली आहे.
लातूर-उमरगा रोडवरील नारंगवाडी पाटीजवळील फुलावर लातुर कडून येणारा पिकअप क्र. MH-06 AG 8904 याने उमरगा कडून लातुर कडे निघालेल्या इनोव्हा कार क्रमांक. MH25 AW 0099 ला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनीनी दिली.अपघातात इनोव्हा कार व पिकअपचे मोठे नुकसान झाले असून, कोणत्याही प्रकाराची जीवीत हानी झाली नसून, या अपघातात शिवसेना (उबाठा)गटाचे वरीष्ठ नेते बाबा पाटील हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना प्रथमोपचारा करीता उमरगा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या अपघातात अजय सिद्राम जमादार वय-40 वर्ष , शंकर अप्पाराव लवटे,वय- 55 वर्ष, शंकर माणीक जमादार, वय- 40 वर्ष, धनराज वडदरे,वय- 45 वर्ष,सर्व राहणार कराळी विठ्ठल निवृत्ती माने, वय 55 वर्ष, रा. मदनेवाडी हे किरकोळ जखमी झाले असून, सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल होऊन जखमीनां विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली. अपघात घडल्याची माहिती कळताच घटनास्थळी किशोर सांगवे, वैजनाथ काळे,आण्णासाहेब पवार, प्रदिप सांगवे, गोपाळ औरादे, महेश शिंदे, विठ्ठल चिकुंद्रे, अमोल चव्हाण आदीनी तात्काळ मदत कार्य करुन जखमीना प्रथमोपचार करीता उमरगा येथे पाठविले