लोहारा :- डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एन एम एम एस परिक्षेत याही वर्षी जि. प.प्रशाला भातागळी शाळेने अखंड यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.या शाळेतील श्रद्घा प्रविण जगताप हीने लोहारा तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तसेच नंदिनी देडे, श्रेयश जगताप, साईराज जगताप, ऋतुजा देशमुख,शिवानी कुलकर्णी, शितल जगताप,सायली जगताप, अलिशा शेख, सोहम जगताप या विध्यार्थ्यानीही घवघवयीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व विद्यार्थ्याना शिक्षक बालाजी माने, मधुकर शिंदे, सुषमा जट्टे यानी मार्गदर्शन केले. त्याबद्घल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकिशोर गायकवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोंडीबा कारभारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी आनंदगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकिशोर गायकवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोडिंबा कारभारी, विठ्ठल कवाळे, बालाजी नाईक, मेघराज कदम, सुर्यकांत वैरागकर, शंकर काळे, विशाल साळवे, सोनाली जगताप, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.