अखिल भारतीय धनगर समाज महासंघ संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप घोडके 

0
242

लोहारा :-  अखिल भारतीय धनगर समाज महासंघ संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी लोहारा शहरातील माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय धनगर समाज महासंघ संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय गाडेकर यांनी जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्ष यांच्या निवडी घोषित केले. जिल्हाध्यक्ष पदी प्रताप घोडके, जिल्हा कार्याध्यक्षपदी वैजनाथ कागे, जिल्हा सरचिटणीस पदी रघुवीर घोडके, लोहारा तालुकाध्यक्षपदी बालाजी कोरे, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी प्रवीण घोडके, उमरगा तालुकाध्यक्षपदी विजयकुमार सोनकटाळे, लोहारा शहराध्यक्षपदी युवा नेते प्रेम लांडगे, लोहारा तालुका उपाध्यक्षपदी सचिन केरुरे यांच्या निवडी घोषित करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्यांचा यथोचित सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस लोहारा तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे, कल्लप्पा गाडेकर, माजी उपसरपंच संदीप राठोड, नागनाथ ढोबळे, मनोहर घोडके, सौरभ कागे, गायकवाड, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here