श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची कु.सुप्रिया गायकवाड  महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण

0
122

 

 

उमरगा  :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन मंत्रालय महसूल विभागातील महसूल सहाय्यक या पदाच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवड झाल्याबद्दल कु सुप्रिया गायकवाड हिचा सत्कार आणि अभिनंदन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांचा हस्ते करण्यात आला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गायकवाड यांनी 2024 मध्ये मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तिची मंत्रालय महसूल सहायक म्हणुन निवड झाली आहे. येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 12 वी विद्यान उत्तीर्ण झाल्यानंतर बी ए आणि एमए याच महाविद्यालयात शिकत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली. महाविद्यालय करिअर कट्टा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि ग्रंथालय अभ्यासिका ची मदत झाली असे गायकवाड हिने म्हंटले आहे. यावेळी प्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य प्रा. जी एस मोरे डॉ व्ही डी देवरकर यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल कु सुप्रिया गायकवाड हिचे भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकर हराळकर, सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here