उमरगा :- शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील संगणक विभागातील विद्यार्थ्यांचे दि.११ रोजी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या टेक्नोफेस्ट-2025 पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत यश .या स्पर्धेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील संगणकशास्त्र विभागातील शरण पाटील, शेख सलसाबिल, लवटे तृप्ती, ब्याळे कांचन, वाघमोडे भाग्यश्री या सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस शरद पाटील यांच्या ‘ अग्रो बायोटेक्नोलाॅजी फॉर फार्मर्स ” पोस्टरला मिळाले. या स्पर्धेसाठी विध्यार्थींना महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रेवते सूर्यकांत, डॉ शेळके बी ए, श्रीमती नितनवरे रेश्मा, डॉ व्ही एस सुर्यवंशी , डॉ. राजेंद्र सुर्यवंशी व अजय कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले.या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे, उपाध्यक्ष अश्लैश भैया मोरे व तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अस्वले संजय, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ पद्माकर पिटले यांनी कौतुक केले.