आदर्श महाविद्यालयाची  विद्यार्थीनी कु. गार्गी कुलकर्णी प्राणी शास्त्र विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्व प्रथम 

0
166

 

 

 

उमरगा – आदर्श महाविद्यालयातील एम.एस्सी प्राणी शास्त्र या विषयाची विद्यार्थीनी कु. गार्गी कुलकर्णी हिने प्राणी शास्त्र विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.आदर्श महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांची ती कन्या आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यापीठीय एमएस्सी झूलॉजी या विषयात गार्गी कुलकर्णी हिने डब्बल ए प्लस श्रेणी उत्तीर्ण होऊन झूलॉजी या विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुणानुक्रमे सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.धनंजय मेनकुदळे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या यशा बद्दल श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर , संचालक मल्लीनाथ दंडगे यांच्या वतीने गार्गीचे अभिनंदन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वतीने गार्गीचा सत्कार करण्यात आला. तिच्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here