उमरगा:- न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असताना खोट्या माहितीच्या आधारे शासनाची फसवणूक करून तलाठयाची नौकरी मिळवण्याऱ्याची सखोल चौकशी करून सेवेतून निलंबित करण्यात यावे या करिता बसवणे कुटुंबीयांसह अमरण उपोषणास बसले आहेत. या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा यांना देण्यात आले आहे.याबाबत लक्ष्मीबाई ऊर्फ रुक्मीणी योगेश बसवणे रा. निटूर ता. निलंगा हल्ली मुक्काम जेकेकुर ता. उमरगा यांनी उपविभागीय अधिकारी उमरगा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,या यापूर्वी दि. ४ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात याबाबात निवेदन दिले होते.त्यामध्ये शुभम श्रीमंत कोणे या व्यक्तीवर गु.र.नं. ३७२/२२ कलम ४९८- ए ३२३,५०४,५०६ सह ३४ भा.द.वि. प्रमाणे पोलिस स्टेशन उमरगा येथे गुन्हा नोंद आहे.पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पूर्ण करुन में प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी उमरगा यांचे न्यायालयात आर सी सी नं.१८४/२०२२ अन्वये दोषारोपपत्र दाखल केले आहे . तसेच सदरचे प्रकरण आजरोजी न्यायप्रविष्ठ असताना सदर व्यक्तीने शासनाची फसवणूक करुन, खोट्या माहिती आधारे व दिशाभूल करून तलाठी पदाची नौकरी मिळवली आहे.त्या अनुषंगाने त्याची चौकशी करुन त्याला कायमचे सेवेतून निलंबित करावे. अशा मागणीचा तक्रारी अर्ज दिला होता. परंतू अद्यापपर्यंत तक्रारी अर्जाचा कसलाही विचार झालेला नाही . यामुळे मी परत आपल्या कार्यालयाकडे दि. ४ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाकरीता निवेदन दिले. तरी परंतू, आज रोजी पावेतो कसलीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मी माझ्या दोन लहान मुलांसह माझ्या व लेकरांच्या न्याय हक्कासाठी आज रोजी आपल्या कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसत आहे .या निवेदनावर लक्ष्मीबाई ऊर्फ रुक्मीणी योगेश बसवणे यांची सही आहे. त्यांचे कुटुंबीय दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे.