उमरगा : तालुक्यातील मुरुम येथील छत्रपती संभाजी नगर भागातील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेचा वार्षिक स्नेह संम्मेलन दि.१२ रोजी खुल्या मैदानात उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत मिनीयार होते याप्रसंगी डॉ.नितीन डागा,प्रा.दत्तात्र्य इंगळे,प्रा.शिवाजी घोगरे,प्रा.शिवाजी नवलखेरे,प्रा.दिलीप इंगोले,विठ्ठल पाटील,उमेश भरगुंडे,बोळेगाव सरपंच विलास पाटील, केसरजवळगा माजी सरपंच बलभीम पटवारी,महंमद रफी शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून द्वीपप्रजवलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. चिमुकल्यानी विविध हिंदी, मराठी गीताच्या तालावर सुंदर नृत्य सादरीकरण करीत उपस्थित पालक,प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लहानपणापासून सवय लागावी यासाठी खेळ, संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्यावतीने राबविण्यात येत असतात, चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना न्याय मिळावा यासाठी गुरुकल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. या सर्व मुलांना मार्गदर्शन रफिक शेख यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मयुरी चौधरी,अपर्णा पोतदार,सुनीता सोबाजी,अनिता वडतीले,मालाश्री पाटील,ऐश्वर्या रोळे, भाग्यश्री पीचे,भाग्यश्री कुंभार,भाग्यश्री पुजारी, नूरसे रियाज ,श्रीकांत भोज, रुपाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी चौधरी, प्रास्तविक आनंद चौधरी तर आभार दिनकर पाटील यांनी मानले, वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रमासाठी पालकांचा,प्रेक्षकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
Home आरोग्य व शिक्षण गुरुकुल वार्षिक स्नेह संमेलनात चिमुकल्यांचे लाठीकाठी च्या माध्यमातून विविधतेतुन एकतेचे दर्शन