आरंभ प्रतिष्ठानच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

0
219

उमरगा:- शहरातील आरंभ प्रतिष्ठान तर्फे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि.१८ रोजी रात्री ९ वाजता छत्रपती शिवरायांचा पोवड्याचा कार्यक्रम महिला शिवशाहीर अनिताताई खरात (ऐवळे) आणि टीम यांच्याकडून सादर करण्यात आला. रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा करण्यात आला, या कार्यक्रमासाठी धाराशिव लोकसभेचे माजी खा. रवींद्र गायकवाड तसेच उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी , डी.के.माने , प्रा.सचिन शिंदे तसेच झांशी ग्रुपच्या सौ.उषा गायकवाड, सुलक्षणा शिंदे, डॉ. प्रतिभा सातपुते, डॉ ज्योती सातपुते, जिजाऊ ब्रिगेडच्या संध्याताई शिंदे ,साखरे मॅडम आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.दि. १९ रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, सचिन जाधव, रामकृष्ण बिराजदार, योगेश तपसाळे,शंतनु सगर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, दुपारी १२ वाजता प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, दुपारी ४ वाजता प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षलागवड करण्यात आली, सायंकाळी ७ वाजता प्रतिष्ठानच्या वतीने ५१ गरजू लोकांना रेशनकिटचे वाटप करण्यात आले.या संपूर्ण आयोजनासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष आकाश मोरे, उपाध्यक्ष मंगेश भोसले, सचिव सौरभ साठे, अजय कांबळे, रोहित लोभे, अजित राठोड, अजय बिराजदार, आशिष रेड्डी, नितीन नांगरे, साईराज व्हनाळे, प्रतीक जाधव, योगेश चव्हाण, धीरज पवार, कृष्णा इंगळे, बालाजी खडपे आदी सदस्यांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here