लोहारा खुर्द येथील सुलोचना  इंगळे यांची महसूल सहाय्यक पदावर निवड 

0
227

लोहारा :-  तालुक्यातील लोहारा खुर्द येथील कुमारी सुलोचना गोविंद इंगळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत निवड होणारी गावातुन ही पहिली कन्या आहे. यांची निवड झाल्याने लोहारा खुर्द ग्रामस्थांच्या ह.भ.प.शिवाजी महाराज रसाळ यांचे हस्ते नागरि सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन बाळू रसाळ, पोलीस पाटील बिरुदेव सूर्यवंशी, चेअरमन बळी इंगळे, माजी सरपंच शेखर पाटील, माजी चेअरमन मुकुद इंगळे, तंटामुक्त अध्यक्ष अनिल इंगळे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत सूर्यवंशी, संभाजी पाटील, महादेव पाटील, सुग्रीव पाटील, दत्ता मुरटे, बबन रसाळ, रवींद्र रसाळ, गणेश रसाळ, ज्ञानेश्वर रसाळ, भालचंद्र इंगळे, बाळू रसाळ, नितीन मुरटे, आनंदा रसाळ, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here