शोधवार्ता पुरस्काराने  पत्रकार बालाजी बिराजदार सन्मानित

0
37

 

लोहारा:-  उदगीर (जि. लातूर ) येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा शोधवार्ता पुरस्कार लोहारा शहरातील पत्रकार बालाजी बिराजदार यांना देऊन सन्मानित करण्यात आले. उदगीर येथील तालुका पत्रकार संघाकडून दरवर्षी मराठवाडास्तरीय शोधवार्ता व विकासवार्ता गटात स्पर्धा घेतली जाते. शहरातील लोकमतचे पत्रकार बालाजी बिराजदार यांच्या ‘आयुष्याचा धागा विणता विणेना, सुई मिळेना जीवनाची!’ या बातमीला ‘शोधवार्ता पुरस्कार’ मिळाला. शनिवारी उदगीर येथील उदगिरी लेन्स नेत्र रूग्णालय सभागृहात पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ मोतीपवळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार डॉ.काळगे, आमदार बनसोडे यांच्या हस्ते बालाजी बिराजदार यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी पत्रकार निळकंठ कांबळे, माजी उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख (ठाकरे गट) अमोल बिराजदार, प्राचार्य शहाजी जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here