लोहारा :- शहरातील भारतमाता मंदिरात दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी ग्राम स्वच्छतेचे पुरस्कर्ते, तसेच आपल्या कीर्तनाच्या प्रभावी मध्यामातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मंदिर परिसरातील वाढलेले काटेरी झुडपे, गवत, कचरा गोळा करून स्वच्छ्ता करून सेवा कऱण्यात आली. याप्रसंगी रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे प्रमुख शंकर जाधव, समिति सदस्य विरेश स्वामी, शिवाजी फुलसुंदर, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव, पोलिस पाटील मारुती लोहार, प्रा.यशवंत चंदनशिवे, सर्पमित्र श्रीनिवास माळी, गणेश हिप्परगेकर, अरुण मक्तेदार, पिंटू लोखंडे ,मंथन जाधव अदि, उपस्थित होते.