पेठसांगवी येथील शाळेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची चोरी 

0
554

उमरगा :- तालुक्यातील पेठ सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व यशवंतराव चव्हाण विद्यालय येथे शाळेच्या सुरक्षेकरीता काही दिवसापुर्वीचं बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे दि. 22 रोजी सायं.6 ते दि. 23 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे.लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.22 रोजी सांयकाळी 06.00 ते दि.23 रोजी सकाळी 10.30 वा. सु. जि.प.प्रा. शाळा पेठसांगवी ता.उमरगा जि. धाराशिव येथील पांढऱ्या रंगाचे टीन्डी कंपनीचे बुलेट कॅमरे मॉडेल असलेले सी.सी. टी. व्ही. कॅमरे तसेच  खाजगी अनुदानित संस्था यशवंतनगर चव्हाण विद्यालय पेठसांगवी शाळेतील चार पांढऱ्या रंगाचे हाईकव्हीजन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असा एकुण 12,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराची फिर्यादी कल्पना अशोक गुंजोटे,  वय 38 वर्षे, व्यवसाय मुख्याध्यापिका  जिल्हा परिषद शाळा  पेठसांगवी ता. उमरगा जि. धाराशिव रा. महालिंगरायवाडी ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. संस्कृती नगर लातुर यांनी दि.23 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो .ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here