उमरगा येथील 6 वर्षाच्या फरहान मुल्लाचा  पहिला रोजा 

0
242

 

उमरगा / प्रतिनिधी – आज पासून रमजान महिन्याच्या रोजा (उपवास ) ला प्रारंभ झाले असून,  समस्त  मुस्लिम समाज बांधवा आजपासून एक महिना उपवास करतात. आज पहिला रोजा झाला. उमरगा येथील फरहान मुल्ला वय ६ वर्षे या चिमुरड्याने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला. रमजान महिन्यात लहान चिमुरड्यानी केलेल्या नमाजाचे मुस्लिम समाज सर्वत्र कौतुक होत आहे.  इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारकआहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात.   प्रामुख्याने सहा वर्षांपेक्षा लहान मुले रोजाचा उपवास करीत नाहीत. पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी  नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्याने उपवास सोडला.फरहान हा उमरगा येथील सामाजिक कार्यकर्ते जाहेद मुल्ला यांचा मुलगा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here