माळेगाव येथील श्री.बेलीकृष्ण (विष्णू) भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत संपन्न

0
174

 

लोहारा :-  तालुक्यातील माळेगाव येथील श्री.बेलीकृष्ण (विष्णू) भगवान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळशारोहण समारंभ सोहळा दि.2  रोजी शिवसेना उपनेते तथा माजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माळेगाव येधे बेनितुरा नदी उगमस्थान असलेल्या व इतिहासाकालीन वारसा असलेल्या बेलीकृष्ण (विष्णू ) मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहन समारंभ उत्साहात पार पडला. दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातुन कळस घेऊन भव्य दिंडी काढण्यात आली. या दिंडित महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. रात्री ह.भ.प.नाथ महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली, काल्याची कीर्तन सेवा ह.भ.प.गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर यांनी केली. या समारंभास ह.भ.प.गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर, जेवळी येथील श्री सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधीश, मनिप्र गंगाधर महास्वामीजी, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, सरपंच वैभव पवार, उपसरपंच राहुल गर्जे, पोलीस पाटील बालाजी कदम, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कानेगावकर, ह.भ.प. श्री विश्वनाथ गर्जे महाराज माळेगाव, पद्माकर कोळी गुरुजी,शरद कुंभार, श्रीधर गर्जे, भीमराव कदम,तुकाराम गर्जे, रत्नदीप मुरमे, शिवाजी गोरे, जीवन पाटील, अमोल पाटील, नागेश गर्जे, संदीप गुंड, महादेव जांभळे, अनिल जांभळे, संतोष मसलगे, बालाजी गुंड, शिवाजी पवार, महात्मा गोरे, राम गर्जे, दिनकर पवार, यांच्यासह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here