पेठसांगवी येथील 7 वर्षीय सुफीयान पठाण या बालकाचा पहिला रोजा पुर्ण 

0
116

उमरगा :- तालुक्यातील पेठसांगवी येथील चॉंद दस्तगीर पठाण यांचा 7 वर्षाचा मुलगा सुफीयान पठाण यांने रमजान महिन्याचे रोजे (उपवास ) सुरु झाले आहेत म्हंटल्या नंतर आई नगमा चॉंद पठाण व वडील चॉंद पठाण यांच्याशी रोजा करण्याची जिद्द करुन त्यांने रमजान चा पहिला रोजा केल्याने गावात व परीसरात कौतुक करण्यात येत आहे.

 

मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु झाला असुन या रमजान महिण्याचे औचित्य साधुन पेठ सांगवी गावातील सुफीयान पठाण(वय 7 वर्ष) या लहान बालकाने दि.2 मार्च रोजी पहिला रोजा (उपवास) पुर्ण केला आहे.याप्रसंगी रोजा पुर्ण केल्याच्या आनंदात आई,वडील यांनी मुलाला रोजा इफ्तारीच्या प्रसंगी नवीन  ड्रेस भेट देवून, पुष्पहार गळ्यात घालून परीवारात आनंद साजरा करण्यात आला. या लहान बालकाने रोजा (उपवास) केल्याने या बालकाचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here