लोहारा :- लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड लोहारा (खुर्द) येथे दि.4 रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन कारखान्याचे वरिष्ठ सरव्यवस्थापक छगनजी भोगाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.