उमरगा: – महाराष्ट्र कर्नाटक सिमावर्ती भागातील धाराशिव जिल्ह्यातील कसगी गावातील सिध्देश्वर देवस्थान येथे गेल्या 59 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद धाराशिव, पंचायत समिती उमरगा व ग्राम पंचायत कसगी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशु व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प.स. सभापती मदन पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. शालीनी ताई जिवनगे, डॉ.विक्रम जिवनगे यांच्या हस्ते मंगळवार दि.4 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला आहे.या उद्घाटनप्रसंगी कसगीचे सरपंच हाणमंत गुरव, उपसरपंच सौ.शारदा आलगुडे, तंटामुक्ती चे अध्यक्ष शशिकांत चनपटने, विकासेसोचे चेअरमन सिध्दाराम सुंटनुरे, डॉ. वाडीकर, प.स. विस्तार अधिकारी संजय राऊत, ज्ञानेश्वर इंगळे, पांढरे, सदस्य सायबा सोनकांबळे, मल्लीनाथ बोरूटे, रमेश पुजारी, अंबादास गाडेकर, धनराज जगदाळे, मल्लीनाथ मुलगे, नागेश पुजारी, अमोल माशाळे ग्रामपंचायत अधिकारी श्रीशैल्य कलशेट्टी याञा कमीटी चे अध्यक्ष डॉ.विठ्ठल जाधव, उपाध्यक्ष संजय नंदर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, सोलापूर, कर्नाटक राज्यातील गुलबर्गा, बिदर या जिल्ह्यातील पशुपालक सहभागी होतात. याञा कमीटी गेल्या 59 वर्षांपासून नवनवीन प्रयोग करीत याञेत पशुपालकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रदर्शनामध्ये उस्मानाबादी शेळी, संकरीत वासरांची व गायींची निवड, खिल्लार जनावरे, खोंड व बैलांची निवड, कुस्ती, शोभेची दारूकाम तद्नंतर हभप. शरद महाराज बिराजदार यांचे सुश्राव्य किर्तन सेवा होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कनमुसे यांनी केले. प्रास्ताविक विठ्ठलराव जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय नंदर्गे यांनी मानले.
उद्घाटन कार्यक्रम होताच येणेगुर येथील परमहंस उर्फ पप्पू गुंडाप्पा हेंडले यांची बैलजोडी तब्बल 285000/- दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ला विक्री झाल्याची नोंद झाली आहे तर संकरीत गाभण गाय प्रकारात येणेगुर येथील अश्फाक आयुब मुल्ला यांची 110000/- एक लाख दहा हजार रुपये, महेबुब गुंडू मुल्ला यांची 105000/- एक लाख पाच हजार रुपये तर मुक्तार आयुब मुल्ला यांची गाय 95000/- पंच्यान्नव हजार रुपये ला विक्री झाल्याची माहिती दिली.