उमरगा :- तालुक्यातील मुंबई- हैद्राबाद महामार्गा जवळील उमरगा – बलसुर रोडवर दि. 5 रोजी रात्री ठीक 7:30 वाजता पंजाब मधुन पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या हार्वेस्टर चा आपघात हार्वेस्टर क्रमांक PV 11 DH4579 हा हार्वेस्टर Have it जवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने हार्वेस्टरवर कामासाठी असलेला मजुर छोटु कुमार शर्मा वय वर्षे 35 राहणार रघुनातपुर, बिहार, खाली पडला असता त्याच्यावरुन हार्वेस्टर गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहीती मीळताच उमरगा चौरस्ता येथे गेली तेरा वर्षे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले आसता डॉक्टर ने तपासुन मृत घोषित केले असल्याची माहिती रुग्ण वाहिका चालक लवटे यांनी दिली .