संत चोखामेळा अध्यासन केंद्र आयोजित प्रकाशन सोहळ्याचे उदघाटन भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

0
35

संत चोखामेळा अध्यासन केंद्र आयोजित प्रकाशन सोहळ्याचे उदघाटन भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

 

लोहारा:-  संत चोखामेळा अध्यासन केंद्र आयोजित चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समिती आयोजित ‘चित्रमय समता वारी अहवाल पुस्तिका’ व ‘संत सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तुत्व’ प्रकाशन सोहळ्याचे‌ उद्घाटन भाजपा नेते. माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भूम येथे करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी ह.भ.प. अरुणजी काळे महाराज होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.सोमनाथ बाबर महाराज व प्रा.सौ.अलकाताई सपकाळ, हेमंतराव देशमुख, अदि, उपस्थित होते. या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, महादेव आप्पा आखाडे, वाशी तालुकाध्यक्ष राजगुरू कुकडे, सरचिटणीस संतोष सुपेकर, शंकर खामकर, अंगद मुरुमकर, जेष्ठ नेते चंद्रकांत भगत, प्रदीप साठे, सिध्दार्थ जाधव, आकाश शेटे, रघुनाथ वाघमोडे, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मण भोरे, अतुल अंधारे, शुभम खामकर, ह.भ.प.योगेश आसलकर, महिला मोर्चा च्या लताताई गोरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here