लोहारा :- नाफेड आणि महाकिसान संघ अंतर्गत माकणाई हमी भाव खरेदी केंद्र माकणी या खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी हमी भावाने झाल्याने शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. यानंतर तूर खरेदी चालू झालेली आहे. मात्र शेतकऱ्यांनी तूर पिकाची ई पिक पाहणी केलेली नसल्या मूळे माकणी हमी भाव खरेदी केंद्र बंद ठेवावे लागले आहे. अडतं वरील भाव आणि तुरीचे हमी भाव समान चालत आहेत, त्यात ई पिक पाहणी चा नियम असल्यामूळे शेतकरी तूर अडती वर पाठवत आहेत. सध्या या करणा मूळे हमी भावाने तूर खरेदी चालू होऊन ही सेंटर बंद आहेत. लोहारा तालुक्यात 0.2% लोकांनी सुद्धा तूर पिकाची ई पिक पाहणी केलेली नाही. आता येणाऱ्या काळात माकणी सेंटर ला हमी भावाने हरभरा खरेदी ही चालू होणार आहे. हरभरा भाव 5650 रु आहे. लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन आमच्या सेंटरला घातल्याने सर्व शेतकऱ्यांचे माकणाई फेडरेशन माकणी चेअरमन शुभम शिवाजीराव साठे यांनी आभार मानले आहे.