लातूर- उमरगा रोडवरील लक्ष्मी पाटी समोर हायवा – पिकअप चा अपघात ; एक जखमी
उमरगा :- तालुक्यातील उमरगा-लातूर रोडवरील लक्ष्मी पाटी समोर दि. 8 रोजी रात्री ठीक 8:30 वाजण्याच्यासुमारास लातूर कडुन येणार्या पिकअप क्रमांक KA 32 C 5911 ला उमरग्या कडून येणारा हायवा क्रमांक MH04 EL 4683 ने धडक दिल्याने पिकअप मध्ये प्रवास करणारे शरणबसाप्पा चंद्रशाह बिराजदार, वय- 48, राहणार- भंगरगा, ता .आळंद हे जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले . असल्याची माहिती रुग्ण वाहिका चालक लवटे यांनी दिली.