लातूर- उमरगा रोडवरील लिंबाळे यांच्या शेता जवळ खड्यात ऑटो पल्टी; दोघे गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी
उमरगा :- तालुक्यातील लातूर- उमरगा रोडवरील लिंबाळे यांच्या शेताजळील खड्यात जाऊन ऑटो पल्टी होऊन दोघे गंभीर तर एक कीरकोळ जखमी झाल्याची घटना दि.9 मार्च रोजी दुपारी 2:15 वाजण्याच्यासुमारास घडली आहे. सविस्तर माहिती याप्रमाणे दि. 9 मार्च रोजी दुपारी ठीक 2:15 वाजता उमरगा येथून पेठसांगवी कडे जाणारा ऑटो क्रमांक MH14 J P I4465 हा खड्यात जाऊन पडल्याने तीघे जखमी झाले असून, सदर अपघातात इरफाना हमीद पठाण वय- 40 वर्ष, राबीयाबी मुस्तफा मोगरगे, वय- 65, सोहेल मोगरगे वय – 30 वर्ष सर्व राहणार पेठसांगवी येथील आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्ण वाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.