कासार शिरसी :- जागतिक महिला दिनानिमित्त नानी माँ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साऊ एकल महिला पुनर्वसन समिती निलंगा तालुका समन्वयक फिरोज जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला या सक्षमीकरण मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना डविले मॅडम बचत गट समन्वयक रावते सर येथील मुख्याध्यापिका होळकुंदे मॅडम अलका मुळे शीतल बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्याला एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक फिरोजागीदार यांनी मार्गदर्शन करताना येथील महिला आणि शासकीय योजना व बालसंगोपन योजना संजय गांधी निरादार योजना कृषी योजना बचत गट योजना जिल्हा उद्योग केंद्र योजना या शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिला छोटे-मोठे उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत साऊ एकल महिला पुंर्वसन समिती कोरोना काळा पासून विविध एकल महिलाना योग्य ते सहकार्य मार्गदर्शन करण्याचे काम करत आहोत एकल महिला भगिनींना शासकीय योजनाची खरी गरज आहे आणि साऊ एकल महिला समितीच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे कौशल्य प्रशिक्षण आणि लघु उद्योग प्रशिक्षण देऊन महिलांना सक्षम करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणार आहोत या मेळाव्याला यावेळी उपस्थित रावते सर यांनी महिला बचत गट आणि महिला महिला उद्योग प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन केले व उपस्थित कल्पना ढविले मॅडम यांनी एकल महिलांचे गट बांधणी करून महिलांना सक्षम करण्याविषयीचे चर्चा केले या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी परिसरातील अशा बिराजदार शीतल बिराजदार व अनेक महिलांनी सहभाग घेतला