उमरगा नगरपरिषदेचा सन-2025-2026 चा 232 कोटी 84 लाख रुपयांचा अंदाजपत्रक मंजूर

0
181

उमरगाः येथील नगरपरिषदेचे  लेखाधिकारी कृष्णा काळे, व अंतर्गत लेखाधिकारी  मनोज जंगले यांनी कोणतीही करवाढ अथवा दरवाढ न करता सन 2025-26 चा  232  कोटी 82 लाख ४ हजार एकशे  त्र्याह-तार रुपयांचा अर्थसंकल्प नगर परिषद चे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामकृष्ण जाधवर यांच्या कडे दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्यासुमारास  सादर केला त्यास मुख्याधिकारी  रामकृष्ण जाधवर यांनी प्रशासकीय मंजुरी दिली.

सन 2025 -2026 चा उमरगा नगरपरिषद चा अर्थसंकल्प पुढील प्रमाणे :- नगरपरिषद कार्यालय उमरगा साल सन २०२४-२५ चे सुधारित अंदाजपत्रक व साल सन २०२५-२०२६ चे वार्षिक अंदाजपत्रक साल सन २०२५-२६ प्रारंभीक शिल्लक रक्कम रु ३७,३१,३९,८८५ अधिक महसुली जमा रक्कम रु १६,४५,१५,००० व भांडवली जमा रक्कम रु १७,९१,०००,००० असे एकूण जमा रक्कम रु २३२,८६,५४,८८५ वजा महसुली खर्च रक्कम रु १५,९६,८६,००० व भांडवली खर्च रक्कम रु-२१६,८५,१८,१७३ एकूण खर्च २३२,८२,०४,१७३ वजा जाता अखेर शिल्लक रक्कम रु ४,५०,७१२ शिलकी आंदजपत्रकास कोणतीही करवाढ व दरवाढ न करता मंजूरी प्रदान करण्यात आली.     तसेच साल सन २०२५-२६ साठी दिव्याग कल्याणसाठी तरतूद रक्कम रु ६,५०,०००, तसेच महिला व बालविकास कल्याण निधी तरतूद रक्कम रु ५,००,००० ,अल्पसंख्यांक विकास निधी साठी रक्कम रु ५ ,००,००० तसेच प्रधानमंत्री आवास योजना साठी रक्कम रु १० ,००,००,००० व रमाई आवास घरकुल योजना साठी रक्कम रु २,००,००,००० तरतूद ठेवण्यात आली आहे.   साल सन २०२४-२५ चे सुधारित आंदजपत्रक व साल सन २०२५-२०२६ चे वार्षिक अंदाजपत्रकास मुख्याधिकारी तथा प्रशासक रामकृष्ण जाधवर यांनी दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली .सदर अर्थसंकल्प लेखाधिकारी कृष्णा काळे आणि अंतर्गत लेखापरीक्षक मनोज जंगले यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे सादर केला, यावेळी कार्यालयीन अधीक्षक प्रसाद माळी, रोखपाल,व्यंकट माळी, पाणी पुरवठा अभियंता गणेश पुरी, संगणक अभियंता महेश शिंदे, आदी नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here