मुबंई – हैद्राबाद महामार्गावरील स्वामी पेट्रोल पंप समोर  दुचाकी – पिकअप चा अपघात ; एक जखमी

0
425

उमरगा :- शहरापासून जवळच असलेल्या मुबंई – हैद्राबाद महामार्गावरील स्वामी पेट्रोल पंप समोर  दुचाकी – पिकअप चा अपघात दि. 13 मार्च रोजी सकाळी ठीक 10:45 वाजण्याच्यासुमारास जकेकुर वाडी येथुन उमरग्याकडे जाणारी मोटार सायकल क्रमांक  MH 25AE 5036 ही स्वामी पेट्रोल पंपा समोर येताच पाठीमागुन येणारा पिकअप क्रमांक MH15JC 7367 ने पाटीमागुन धडकदिल्याने दुचाकी चालक विशाल गणपत भोसले वय 20 वर्ष रा.जकेकुर वाडी हा जखमी झाला. असल्याची घटना घडली आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्ण वाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here