गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालयाचे निरंजन झिंगाडे चा सत्कार

0
111

उमरगा :- तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालयाचे  माजी विद्यार्थी  निरंजन संजय झिंगाडे यांची नुकतीच मुंबई परिमंडळात वस्तू व सेवा कर निरीक्षक पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा  सत्कार करण्यात आला.तसेच व्यंकट नारायणराव झिंगाडे यांची उमरगा भावसार क्षत्रिय समाज अध्यक्ष पदी निवड झाली याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे अध्यक्ष श्रीकृष्ण शिक्षण संस्थाचे उपाध्यक्ष  प्रभाकरराव हिरवे  यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय कदम , उपमुख्याध्यापक  अजय गायकवाड , पर्यवेक्षक  भालेराव , प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  दत्तात्रय गायकवाड  व प्रा.अभयकुमार हिरास  यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रास्ताविक पर विचार . अजय गायकवाड यांनी मांडले. .निरंजन झिंगाडे यांनी सत्काच्या उत्तरादाखल विचार मांडले. विद्यार्थ्यांना MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच सुपर 40 ही विद्यालयात चालू करण्यात येणारी बॅच विद्यार्थ्यांसाठी साठी कशी चांगली आहे यांनी सांगितले. तसेच प्रा.अभयकुमार हिरास सर यांनी ही आपल्या मनोगतात शालेय स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. त्याच बरोबर समुद्राळ येथील डॉ निखिल जाधव यांनी एमबीबीएस डिग्री पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन व आभार  सोमशंकर कुंभार  यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here