मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ.अभिमन्यु पवार यांनी भेट घेऊन औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्याशी निगडित विषयांचा पाठपुरावा केला

0
75

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आ.अभिमन्यु पवार यांनी भेट घेऊन औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्याशी निगडित विषयांचा पाठपुरावा केला

लोहारा :- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आ.अभिमन्यु पवार यांनी भेट घेऊन औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्याशी निगडित विषयांचा पाठपुरावा केला. लातूर आणि नांदेड या दोन्ही ठिकाणी अपर आयुक्तालये कार्यान्वित करावीत आणि भविष्यात जिल्हा निर्मिती झाल्यानंतर दोन्ही अपर आयुक्तालयांचे रुपांतरण आयुक्तालयात करावे. जून 2025 पासून लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणे गरजेचे आहे. आणि जून पासून महाविद्यालय सुरु करायचे असल्यास पूर्व तयारीसाठी वेळ मिळणं गरजेचं आहे, त्यामुळे लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जून 2025 पासून सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता लवकरात लवकर प्रदान करण्यात यावी. नांदेड परिक्षेत्रात एसआरपीएफचा एकही कँप नाही, त्यामुळे लातूर येथे एसआरपीएफचा कँप उभारण्यात यावा. सभागृहात मांडलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने किल्लारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने राबविण्यात यावा. उपरोक्त सर्वच विषयांबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लातूरकरांना अभिप्रेत असलेले निर्णय होतील असा विश्वास आ.अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केला. औसा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी वेळ द्यावा अशीही विनंतीही आ.अभिमन्यु पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here