“होली है भाई होली है बुरा ना मानो होली है” असे म्हणत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा

0
118

“होली है भाई होली है बुरा ना मानो होली है” असे म्हणत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा

 

लोहारा :- येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लहान मुलांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन सप्त रंगांची उधळण करुन रंगपंचमी सणाचा आनंद लुटला. याप्रसंगी स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना रंगपंचमीचा सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व तसेच प्रत्येक रंगाचे विशेष महत्त्व समजावून सांगितले व म्हणाले की, रंगपंचमीचा सण हा आपल्या आयुष्यातील सुख दुःख आपसातील मतभेद विसरून आनंदाने साजरा करण्याचा सण होय. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी आणि शिक्षकांनी पर्यावरणपूरक फुलांच्या रंगांनी व नैसर्गिक रंगाची रंगपंचमी खेळली. डी.जे. व ढोल – ताशांच्या गजरात सारा परिसर आनंदाने न्हावून गेलेला होता. विद्यार्थ्यांनी आपापसात स्नेहभावना आणि ऐक्याचा संदेश देत हा सण साजरा केला. शिक्षकांनी रंगांचा सद्भावना आणि आनंदाशी असलेला संबंध समजावून सांगितला. शाळेच्या व्यवस्थापन समितीने देखील विद्यार्थ्यानीं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात रंगपंचमी साजरी केल्यामुळे त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी, संचालिका सविता जाधव यांनी विद्यार्थ्यांना पाण्याची बचत आणि नैसर्गिक रंगांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. या उत्सवामुळे शाळेत आनंदाचे वातावरण पसरले होते. याप्रसंगी यशवंत चंदनशिवे, सिद्धेश्वर सूरवसे, सोनाली काटे, अनिता मनशेट्टी, वैशाली गोरे, मीरा माने, अश्विनी कोकरे, सरिता पवार, हेमा पाटील, रेश्मा शेख, सुलोचना वकील, शीतल बिराजदार, स्कुलमधील लहान चिमुकले सर्व शिक्षक कर्मचारी, यांच्यासह काही पालकही सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here