उमरगा:- उमरगा तालुका हा शांत, संयमी, सर्व समाजाच्या रितीरिवाजांचा मान, सन्मान राखून जीवनाचा गाडा ओढणारा अशी स्वच्छ, सुंदर प्रतीमा असलेला तालुका म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव कमवलेला असून, या चारित्र्य संपन्न वातावरणाला काही वाईट प्रवृत्तीच्या समाजकंटका मुळे कलंक लागू नये या करीता तालुक्यातील तमाम सर्व जाती धर्माच्या समुदायाच्या लोकांनी प्रयत्न करने गरजेचे आहे. तालुकावाशीयांनी जातीय सलोखा अबाधित राखण्याकरीता एक पाऊल कायम पुढे ठेवून चालल्यास उमरगा पोलीस प्रशासन यात दहा पाऊलांच योगदान देवून सर्व धर्मीयांच संरक्षण करण्याकरीता चोवीस तास डोळ्यात तेल घालून सेवा देण्याच काम करेल असे आवाहन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी उमरगा तालुकावाशीयांना केले आहे.
तालुक्यातील सामाजिक आरोग्याला धोका निर्माण होईल किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह फोटो व पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे फोटो किंवा मजकूर कोणी पोस्ट केले तर याची पोलीसांना तात्काळ माहिती द्यावी.जातीय सलोखा अबाधित ठेवावा, आरडा ओरडा, गोंधळ, अचानक रास्ता रोको, टायर जाळणे असे विध्वसक प्रकार करून कायदा हाती घेऊ नये,अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता कायम राखावी.जे कोणी सार्वजनिक शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– अश्विनी भोसले,पोलीस निरीक्षक, उमरगा पोलीस ठाणे.